कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यूला किटकनाशके जबाबदार? अन्न सुरक्षा विभागाने काय म्हटले?
मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर अन्न विषबाधेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे कलिंगडाबाबत गैरसमज पसरले आहेत. अन्न सुरक्षा आयुक्तांनी फळांवरील किटकनाशकांमुळे मृत्यू होऊ शकत नाही असे सांगितले. डोकाडिया कुटुंबाच्या घरातील खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.