२०२९ ला एकत्र निवडणुका घेणं कठीण, २०३४ साल उजाडणार? काय आहेत कारणं? वाचा सविस्तर!
देशभरात एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्याचा 'वन नेशन, वन इलेक्शन' प्रकल्प कधी अंमलात येईल याची उत्सुकता आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रीय मंत्रीमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली आहे. मात्र, या योजनेची अंमलबजावणी २०३४ पर्यंत होऊ शकते. निवडणूक आयोगाला आवश्यक यंत्रणा उभी करण्यासाठी वेळ लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही एकत्र घेण्याचा प्रस्ताव आहे.