कॅनडाच्या मंत्रिमंडळात समावेश केलेल्या ‘त्या’ दोन भारतीय महिला खासदार कोण?
कॅनडाचे नवीन पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या खासदार अनिता आनंद आणि कमल खेरा यांना मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अनिता आनंद या नाविन्यता, विज्ञान आणि उद्योग मंत्री तर कमल खेरा या आरोग्य मंत्रीपदी नियुक्त झाल्या आहेत. कमल खेरा या कॅनडाच्या संसदेत निवडून येणाऱ्या सर्वात तरुण महिलांपैकी एक असून, अनिता आनंद या वकील आणि संशोधक आहेत.