ज्येष्ठ एअर मार्शल आशुतोष दीक्षित आता भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख
भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांच्या सेवानिवृत्तीनंतर दीक्षित हे पदभार स्वीकारतील. दीक्षित यांचा लढाऊ विमानांचा दांडगा अनुभव असून, त्यांनी कारगिल युद्धातील 'ऑपरेशन सफेद सागर'सह अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे.