स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणारा हमाम अल-हमामी नक्की कोण?
फ्लायदुबईच्या तेल अवीवला जाणाऱ्या विमानातील भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणाऱ्या ओमानी सहवैमानिकाची ओळख हमाम अल-हमामी अशी पटली आहे. हमामवर अतिरेकी विचारसरणीचा संशय होता आणि ओमान एअरने त्याच्यावर उड्डाण बंदी घातली होती. तरीही फ्लायदुबईने त्याला नोकरी दिली. सध्या यूएईमध्ये त्याच्याविरोधात तपास सुरू आहे. इस्रायली आणि यूएईच्या गुप्तचर यंत्रणाही या प्रकरणाचा तपास करत आहेत.