खंडणीप्रकरणी DSP कल्पना वर्मा निलंबित, व्हॉट्सअॅप चॅट्स सापडले; छत्तीसगड सरकारची कारवाई!
छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील पोलीस उपअधीक्षक कल्पना वर्मा यांना निलंबित करण्यात आले आहे. व्यावसायिक दीपक टंडन यांच्यासोबतच्या व्हॉट्सअप चॅट्समुळे त्यांच्यावर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. टंडन यांनी वर्मा यांच्यावर खंडणी मागण्याचा आरोप केला आहे. वर्मा यांनी प्रशासकीय पदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.