राज कुशवाह सोनम रघुवंशीचा साथीदार की प्रियकर? दोघांनी रचला राजाच्या हत्येचा कट!
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. ८ जून रोजी सोनम रघुवंशीला गाझीपूरमधून अटक करण्यात आली. सोनमने तिच्या प्रियकर राज कुशवाहच्या मदतीने राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा दावा आहे. २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह मेघालयमध्ये सापडला. राज कुशवाहने मारेकऱ्यांना सुपारी दिल्याचेही पोलिसांनी सांगितले. सोनम आणि राज कुशवाह यांच्यातील प्रेमसंबंध हत्येचे कारण असल्याची शक्यता आहे.