‘आज रात्री संपूर्ण विनाश होईल’, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला आतापर्यंतची सर्वात मोठी धमकी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला वारंवार धमक्या दिल्या आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांची मुदत दिली होती, जी आता संपत आली आहे. ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा देत आज रात्री मोठा विनाश होणार असल्याचे सांगितले आहे.