भारतासाठी धोक्याची घंटा! इराणचा कतारमधील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर हल्ला
इराणने कतारच्या रास लफान एलएनजी प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर जागतिक ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. या हल्ल्यामुळे उत्पादन थांबले असून भारतावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. भारत ५०% पेक्षा जास्त गॅस कतारकडून आयात करतो. त्यामुळे गॅस आयात विस्कळीत होऊन भारताला वायू वापर कमी करावा लागू शकतो. इराण-इस्रायल संघर्षामुळे ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले वाढले आहेत.