२,५०० वर्षांपूर्वी ‘हिंदूश’ सैन्याने इराणसाठी युद्ध का लढले होते?
इराण-इस्राइल युद्धाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांशी संबंधित अनेक विषय चर्चेत आहेत. त्यातील एक महत्त्वाचा विषय म्हणजे या दोन्ही देशांशी भारताचे असलेले संबंध. इराण म्हणजे प्राचीन पर्शिया. भारताप्रमाणे या प्रांताचाही इतिहास हजारो वर्षे जुना आहे. भारत आणि इराण (पर्शिया) या दोन्ही देशांची सांस्कृतिक नाळ जुळलेली आहे. हाच ऋणानुबंध स्पष्ट करणारी एक घटना २५०० वर्षांपूर्वी घडली. पर्शियन राजा झेरेक्सेसच्या सैन्यात (भारतीय) हिंदूश सैनिकांच्या तुकडीची नोंद असल्याचा संदर्भ सापडतो.