इराणच्या खर्ग बेटावर सर्वात मोठा बॉम्बहल्ला; अमेरिकेच्या कृतीमुळे जगावर तेल संकट ओढवणार?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या खर्ग बेटावर मोठा हल्ला केला आहे. हे बेट इराणच्या तेल उत्पादन साखळीतील महत्त्वाचे केंद्र आहे. ट्रम्प यांनी इराणच्या तेल प्रकल्पांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला आहे. इराणने प्रत्युत्तर देत आखाती प्रदेशातील अमेरिकेला सहकार्य करणाऱ्या तेल कंपन्यांच्या पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. या हल्ल्यामुळे जागतिक तेलाच्या किमती वाढू शकतात.