‘उडवून टाकू’, इराण युद्धानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘ओमान’ला थेट धमकी
इराण युद्धाला तीन महिने पूर्ण होत असताना, शस्त्रसंधी लागू आहे पण युद्धसमाप्तीची चर्चा संथगतीने सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओमानला होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवण्याबाबत धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, होर्मुझ हा आंतरराष्ट्रीय जलमार्ग आहे आणि कुणीही त्यावर नियंत्रण लादू शकत नाही.