ज्योती रानी मल्होत्राच्या चौकशीत नवे खुलासे, पाकिस्तानसह चीनचाही केला होता दौरा!
गेल्या काही दिवसांपासून ज्योती मल्होत्रा हे नाव चर्चेत आहे. ३३ वर्षीय व्लॉगर ज्योतीला हरियाणाच्या हिसार येथून पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिची ५ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी झाली असून, तपासात ती पाकिस्तान आणि चीनला प्रवास केल्याचे समोर आले आहे. ज्योतीच्या सोशल मीडिया चॅनल्ससाठी अतिरिक्त व्यूज आणि लाईक्स मिळवण्याच्या नादात ती अडकली असावी, अशी शक्यता आहे.