राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार का? थेट हो नव्हे, अजित पवार म्हणाले…
महाराष्ट्रात येत्या दोन महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीने जोरदार तयारी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंडळात पूजा केली आणि माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विधानावर प्रतिक्रिया देत 'जनतेच्या मनातलं सरकार येईल' असं म्हटलं. तसेच, महायुती सरकारच्या योजनांची माहिती दिली आणि शेतकऱ्यांच्या मागण्या लवकर निकाली काढण्याची अपेक्षा व्यक्त केली.