‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरुन भाजपा आणि महायुतीतच एकमत नाही? ‘हे’ तीन नेते काय म्हणाले?
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. अशोक चव्हाण यांनी भाजपात असूनही सेक्युलर हिंदू असल्याचे सांगितले. पंकजा मुंडे यांनी "बटेंगे तो कटेंगे" घोषणेची आवश्यकता नसल्याचे म्हटले, तर अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जातीय सलोख्याचे महत्त्व अधोरेखित केले. या वक्तव्यांमुळे भाजपातच एकमत नसल्याची चर्चा होते आहे.