Video: आठवा वेतन आयोग, प्राप्तिकर घोषणा ते न झालेली युती; ‘आप’च्या पराभवाची कारणमीमांसा!
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने ७० पैकी ४८ जागांवर विजय मिळवला, तर आम आदमी पक्षाला २२ जागा मिळाल्या. काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा एकही जागा मिळाली नाही. गिरीश कुबेर यांच्या मते, काँग्रेस-आप आघाडी न होणे, केजरीवाल यांच्या सभ्यतेचा दिखावा, पायाभूत सुविधांची अपूर्णता, केंद्रीय अर्थसंकल्पातील करमुक्ती आणि आठवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय हे भाजपाच्या विजयाचे प्रमुख कारण ठरले.