मुंबईत MIM ला राज ठाकरेंच्या मनसेपेक्षा मिळाल्या जास्त जागा
मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. असदुद्दीन ओवैसींच्या एआयएमआयएम पक्षाने १३ महापालिकांमध्ये १२५ जागा जिंकल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये ३३, सोलापूरमध्ये ८, मुंबईत ८, नागपुरात ६, ठाण्यात ५, आणि नांदेडमध्ये १५ जागा मिळाल्या. मुस्लिमबहुल परिसरात समाजवादी पार्टीला मागे टाकत एमआयएमने चांगली कामगिरी केली. मुंबईत राज ठाकरेंच्या मनसेपेक्षा एमआयएमच्या जागा अधिक आहेत.