महागठबंधनच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार तेजस्वी यादवच पिछाडीवर, RJD चे ‘तेज’ ओसरणार?
बिहार राज्यातील विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव राघोपूर मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या तेजस्वी यादव पिछाडीवर असून भाजपाचे सतीश कुमार आघाडीवर आहेत. तेजस्वी यादव यांनी सरकारी नोकरी, मोफत वीज, जुनी पेन्शन योजना आणि दारुबंदी रद्द करण्याची आश्वासने दिली होती. राघोपूर मतदारसंघ यादव यांचा गड मानला जातो.