महाराष्ट्रातल्या २४६ नगरपरिषदांचे सविस्तर निकाल, वाचा एका क्लिकवर संपूर्ण यादी
गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर आता घेतल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हापरिषदा, ग्रामपंचायती, महानगरपालिकांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, अनुक्रमे २ डिसेंबर व २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. २१ डिसेंबर अर्थात रविवारी मतमोजणी निश्चित करण्यात आली.