राज ठाकरेंच्या मनसेचे चार महापालिकांमध्ये फक्त १३ उमेदवार विजयी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये फक्त ६ जागा मिळाल्या आहेत. राज्यातील २९ महापालिकांपैकी फक्त ४ महापालिकांमध्ये मनसेचे १३ नगरसेवक निवडून आले आहेत. एकेकाळी १३ आमदार असलेल्या मनसेचा आलेख आता खालावत आहे. राज ठाकरे यांनी निवडणुकीतील अपयश मान्य केले असून, मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढाई सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.