नितीश कुमार; इच्छाशासनाचे वरदान लाभलेले बिहारचे भीष्माचार्य
बिहारमधील २०२५ च्या बहुचर्चित विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आणि नितीश कुमार हे अजूनही बिहारच्या केंद्रस्थानी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. या निकालांनी पुन्हा एकदा NDA ला मिळालेल्या बहुमताने उत्साह वाढवलेला असला, तरी भाजपापेक्षा कमी जागांवर लढूनही JD(U) ने दाखवलेली कामगिरी नितीश यांच्या राजकीय किमयेचे नवे उदाहरण ठरली आहे. संख्या कितीही असो, सत्तेच्या खुर्चीवर कोण बसणार हे ठरवण्याची किल्ली मात्र नितीश कुमार यांच्याच हाती असते, असे गेल्या २० वर्षांचा इतिहास सांगतो.