‘राज ठाकरे बिगेस्ट लुजर ठरतील’, मुख्यमंत्री फडणवीसांचे ते वाक्य खरे ठरले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकेच्या मतदानापूर्वी टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर भाष्य केले होते. त्यांनी म्हटले की, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फायदा होतोय, पण राज ठाकरेंना काहीही फायदा होत नाही. फडणवीस यांनी राज ठाकरे 'बिगेस्ट लुजर' ठरतील असेही भाकीत केले.