एकनाथ शिंदे दरेगावात, मतदार बुचकळ्यात, नेमका मोठा निर्णय काय असेल? शिरसाटांचं स्पष्टीकरण!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असून मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्यासाठी गावी गेले आहेत, त्यामुळे तर्क-वितर्क सुरू आहेत. संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं की शिंदे सरकार स्थापनेत अडसर आणणार नाहीत आणि भाजपाच्या निर्णयाला मान्य करतील. राज्य वाऱ्यावर नाही, शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत, असंही त्यांनी सांगितलं.