Vinesh Phogat : गावची खेळाडू सून राजकीय आखाड्यात; विनेश फोगटच्या सासरची मंडळी म्हणतात, “तिच्या लग्नावेळी…”
हरियाणाच्या जुलाना विधानसभा मतदारसंघात कुस्तीपटू विनेश फोगटला काँग्रेसमधून उमेदवारी मिळाली आहे. तिच्या सासरच्या बख्ता खेरा गावात यामुळे आनंद आहे. महिलांना राजकारणात येण्यास प्रोत्साहन मिळेल, असे ग्रामस्थ म्हणतात. विनेशला राठी समुदायाकडून सुवर्ण पदक आणि चौगामा समुदायाकडून बक्षीस मिळणार आहे. तिच्या उमेदवारीमुळे काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.