पाच वर्षांत १,५०,००० पाकिस्तानी नागरिकांची अरब राष्ट्रांमधून हकालपट्टी!
आखाती देशांमधील (Gulf Countries) बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, संयुक्त अरब अमिरातीने (UAE) आपल्या भूप्रदेशातून तब्बल २००० पाकिस्तानी नागरिकांना तडकाफडकी बाहेर काढले आहे. अत्यंत कठोर कायदेशीर पावले उचलत युएई प्रशासनाने या नागरिकांचे पैसे आणि वैयक्तिक सामानही जप्त केल्याचे वृत्त समोर आले आहे. युएईच्या या धक्कादायक कारवाईमुळे पाकिस्तानात तीव्र पडसाद उमटले असून, तेथील अंतर्गत राजकारणात आणि संसदेत मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.