एथिलीन ग्लायकॉल मिसळलेल्या दुधामुळे १५ जणांचा मृत्यू; दुधाची शुद्धता कशी तपासावी?
आयुर्वेदाच्या परंपरेत दूधाला पूर्णान्न म्हटले जाते. दूध हे भारतीय घरांमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि ते कॅल्शियमसह अनेक पोषक घटकांचा समृद्ध स्रोत आहे. मात्र, जेव्हा हेच पोषणाचे साधन विषारी आणि जीवघेणे ठरते, तेव्हा संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रवरम येथे एका विक्रेत्याने शेकडो कुटुंबांना पुरविलेल्या दुधात औद्योगिक कूलंट असलेले एथिलीन ग्लायकॉल मिसळल्याचा आरोप आहे. या घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे.