२७ वर्षीय इंजिनीअरचा ‘Asphyxia’ने मृत्यू; काय आहे ही जीवघेणी स्थिती?
पाण्याने भरलेल्या खड्ड्यात एसयूव्ही कोसळली आणि त्यात असलेल्या २७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याचा मृत्यू झाला, युवराज मेहता असे या मृत युवकाचे नाव आहे. पाण्यात अडकलेल्या युवराज मेहताने जवळपास ९० मिनिटे जीव वाचविण्यासाठी झुंज दिली. बुडत असलेल्या वाहनाच्या छतावर चढण्यात तो यशस्वीही झाला होता.