५ वर्षांत ४ हार्ट अटॅक आणि ८ स्टेंट्स; तरीही ‘हा’ रुग्ण वाचला कसा?
भारतीयांमध्ये पोटाभोवती साचणारी चरबी आणि मेटाबॉलिक असमतोल यामुळे धोका अजून वाढतो. परिणामी वय वर्षे ६० नंतर दिसणारा आजार वयाच्या तिशीतच भेडसावू लागला आहे. किंबहुना अचानक येणार्या हार्ट अटॅकमुळे होणार्या मृत्यूदरातही वाढ झालेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ५ वर्षांत ४ हृदयविकाराचे झटके अनुभवलेल्या आणि नंतर पूर्णत: बर्या झालेल्या रुग्णाच्या अनुभवातून नेमकं काय समजतं, याचाच घेतलेला हा आढावा.