बंदिस्त बेटावर १८७१ मध्ये सोडल्या ५ गायी; १३० वर्षांनी समोर आलं भयानक सत्य!
इसवी सन १८७१ मध्ये ह्युर्टिन नावाच्या एका फ्रेंच वसाहतकाराने हे निर्जन आणि ज्वालामुखीय बेट सोडण्याचा निर्णय घेतला. जाताना त्याने आपल्या मालकीच्या पाच गायी (एक वळू, दोन गायी आणि दोन वासरे) तिथेच सोडून दिल्या. मानवी हस्तक्षेपाविना या ओसाड बेटावर त्या गायींचे जगणे जैविकदृष्ट्या अशक्य वाटत होते. परंतु, तब्बल १३० वर्षांनंतर शास्त्रज्ञांनी जेव्हा या बेटावर पुन्हा पाऊल ठेवले, तेव्हा त्यांना एक मोठा धक्का बसला.