अमेरिकेतील ‘ब्राह्मण’ गायींची मुळे भारतात? ८ हजार वर्षांपूर्वीच्या झेबूशी नेमका काय संबंध?
अमेरिकेत ब्राह्मण नावाचा एक प्रसिद्ध गोवंश आहे. इथे लक्षात घेण्याचा मुद्दा असा की, या वंशाचा भारतीय जातीव्यवस्थेशी कुठलाही संबंध नाही. परंतु, अमेरिकन असलेल्या या गोवंशाच्या माध्यमातून भारतीय गोवंशाने जगाला दिलेल्या पशूधनाची माहिती समजण्यास मदत होते, त्यामुळे या विषयाची माहिती घेणं महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच या वारशाची देवाणघेवाण समजून घेण्यासाठी इतिहासात डोकावून पाहावे लागतं.