काश्मीरमधील बौद्ध धर्माचा २००० वर्षं प्राचीन इतिहास एका फोटोमुळे कसा उलगडला?
फ्रान्समध्ये सापडलेल्या बारामुल्ला येथील तीन बौद्ध स्तूपांचे एक जुने व धूसर छायाचित्र फ्रान्समध्ये सापडले आणि त्यामुळेच काश्मीरचा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा गौरवशाली इतिहास उजेडात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले. ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये मानवनिर्मित भव्य संरचनांचे अवशेष सापडणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून त्यातून राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडते.