पॉम्पेईतील २००० वर्षांपूर्वीच्या ‘मोर्टार मॅन’चा चेहरा प्रथमच जगासमोर
इसवी सन ७९ चा तो काळ… इटलीतील 'माउंट वेसुव्हियस' हा ज्वालामुखी अचानक जिवंत झाला आणि रौद्ररूप धारण केलेल्या लाव्हाच्या उद्रेकात पॉम्पेई हे वैभवशाली शहर अवघ्या काही तासांत राख आणि धुराच्या साम्राज्याखाली कायमचे गाडले गेले. आज याच राखेच्या थराखालून एका अशा व्यक्तीचा चेहरा जगासमोर आला आहे, जो दोन हजार वर्षांपूर्वी मृत्यूशी झुंज देत आपल्या अस्तित्वासाठी धडपडत होता. पुरातत्वशास्त्रज्ञांनी त्याला 'मोर्टार मॅन' (Mortar Man) असे नाव दिले आहे.