नासाच्या चांद्रमोहिमेत ‘शौचालय’ ठरलं डोकेदुखी; अंतराळात कसं पार पडलं ‘स्पेस प्लंबिंग’?
नासाची महत्त्वाकांक्षी 'आर्टेमिस २' चांद्रमोहीम सध्या अंतराळात इतिहास घडवत असतानाच एका विचित्र तांत्रिक अडचणीमुळे चर्चेत आली आहे. अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वच्छतेसाठी बसवलेले 'युनिव्हर्सल वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम' म्हणजेच स्पेस टॉयलेट वारंवार बिघडत असल्याने नासाच्या शास्त्रज्ञांची डोकेदुखी वाढली आहे. ही समस्या नेमकी काय आहे आणि अंतराळात 'प्लंबिंग' कसं केलं गेलं, याचा हा सविस्तर आढावा.