गांधीजींचा आदेश धुडकावणारे ‘गोपाल पाठा’ कोण?
पश्चिम बंगालमधील नवनिर्वाचित भाजप सरकारने कोलकाता येथील एका महत्त्वाच्या रस्त्याचे अर्थात 'सुहरावर्दी अव्हेन्यू'चे नाव बदलून 'गोपाल मुखर्जी रोड' असे केले आहे. हे नाव इतिहासप्रसिद्ध गोपाल पाठा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात आले आहे. गोपाल पाठा यांनी १९४६ मधील भीषण कलकत्ता दंगलीदरम्यान हिंदूंचे नेतृत्व केले होते. त्यांच्या कुटुंबाचा मटण विक्रीचा (बोकडाचा खाटीक खाना) व्यवसाय असल्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर 'पाठा' (बोकड) हे नाव पडले होते…