३ महिन्यांत ब्लॅडर कॅन्सरने होवू शकतो मृत्यू? या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका
लघवीत रक्त दिसणे हे मूत्राशयाच्या कर्करोगाचे एक महत्त्वाचे लक्षण असू शकते. त्यामुळे लघवीचा रंग गुलाबी, लाल किंवा कोला ड्रिंकसारखा दिसू शकतो. बऱ्याच वेळा यामुळे वेदना होत नाहीत, म्हणूनच या लक्षणाकडे बर्याचदा दुर्लक्ष केले जाते. लघवीत रक्त दिसणे हे अनेकदा नेहमचीची बाब मानली जाते. परंतु, या सामान्य दिसणार्या लक्षणाला डॉक्टर गंभीर, जीवघेण्या इशाऱ्यासारखे मानतात.