मणिपूर-मिझोराममधील ब’नेई मेनाशे समुदाय इस्रायलमध्ये का स्थलांतरित होत आहे?
ज्यू आणि भारतीय संस्कृतीचा ऋणानुबंध हजारो वर्षांचा आहे. अलीकडेच मणिपूर आणि मिझोराममधील ब’नेई मेनाशे ज्यू समुदायातील सुमारे २४० ते २५० सदस्यांनी इस्राइलमधील तेल अवीव येथे स्थलांतर केले. ब’नेई मेनाशे ज्यू स्वतःला इस्रायलच्या दहा हरवलेल्या जमातींपैकी एका जमातीचे वंशज मानतात. मणिपूर आणि मिझोराम या दोन राज्यात ब’नेई मेनाशे यांची लोकसंख्या सुमारे ७००० आहे. हा समाज या दोन राज्यांतील मिजो आणि कुकी आदिवासी समुदायांशी संबंधित आहे.