भारतात चित्ते आल्यानंतर वाढलेला गोंधळ; चित्ता, बिबट्या आणि जॅग्वारमधील नेमका फरक काय?
भारतात तब्बल ७० वर्षांनंतर 'प्रोजेक्ट चित्ता' (Project Cheetah) अंतर्गत मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांचे पुनरागमन झाले आणि वन्यजीवांबद्दलची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. मात्र, चित्ते भारतात आल्यापासून सामान्य नागरिकांमध्ये एक नवा गोंधळ पाहायला मिळत आहे. अनेकदा लोक चित्ता, बिबट्या (Leopard) आणि जॅग्वार (Jaguar) या तिन्हींना एकच समजण्याची चूक करतात. हे तिन्ही प्राणी मार्जारवर्गीय (Cat Family) असले, तरी त्यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.