अंड्याचा बलक गडद पिवळा की फिकट पिवळा? नक्की कोणतं अंड पौष्टिक?
अनेकदा अंड्याचा बलक हा वेगवेगळ्या रंगाचा दिसतो. तो कधी गडद पिवळा, फिकट पिवळा, कधी केशरी रंगाच्या जवळ जाणारा असतो. त्यामुळे मनात अनेक शंका निर्माण होतात. अंड्याचा बलक गडद पिवळा असल्यास ते अधिक पौष्टिक असा समज असतो. त्याच पार्श्वभूमीवर अंड्याच्या बलकाच्या रंगामागील विज्ञान जाणून घेण्याचा हा प्रयत्न.