स्त्रीसत्तेचा दबदबा असलेला योगिनी पंथ पितृसत्ताक व्यवस्थेने का नष्ट केला?
जसजसा काळ पुढे गेला, तसतसा राज्यांचा आणि समाजाचा कल सात्त्विक, शाकाहारी आणि पुरुषप्रधान देवतांकडे वाढू लागला. योगिनींच्या मांसाहारी आणि मद्याच्या नैवेद्याची जागा हळूहळू फळे आणि दुधाने घेतली. सुलतानशाहीच्या लष्करी आक्रमणांमुळे या पंथाला राजाश्रय मिळणे कायमचे बंद झाले, त्यामुळे आजच्या दिल्लीत (योगिनीपूर) या पंथाचा मागमूसही उरलेला नाही.