घोड्यांचे रक्त पिऊन साम्राज्यविस्तार करणार्या मंगोलांचा इतिहास काय सांगतो?
मंगोल घोडदळामुळेच चंगेज खानने इतिहासातील सर्वात मोठ्या भू-साम्राज्यांपैकी एक साम्राज्य निर्माण केले. त्याचे सैन्य चीनपासून रशिया, मध्य आशिया, पर्शिया आणि पूर्व युरोपपर्यंत पोहोचले. इतिहासकारांच्या मते, मंगोल सैन्याच्या अफाट गतिमानतेमुळे शत्रूंना त्यांची हालचाल समजण्याआधीच ते हल्ला करत होते. यामुळे अनेक राजांनी लढाई न करता शरणागती पत्करली.