कधीकाळी पृथ्वीवर राज्य करायचा ३ खुरांचा घोडा; तो नाहीसा कसा झाला?
पृथ्वीचा इतिहास हा अनेक अद्भूत प्राण्यांच्या उदय, उत्क्रांती आणि अस्ताची कहाणी आहे. आज आपण ज्या घोड्याला पाहतो, तो एकाच खुराचा (एक बोटाचा) अत्यंत वेगवान प्राणी आहे. परंतु, घोड्यांच्या उत्क्रांतीचा इतिहास पाहिला तर कोट्यवधी वर्षांपूर्वी या पृथ्वीवर तीन खूर असलेले घोडे राज्य करत होते. या तीन खुरांच्या घोड्यांच्या समूहामध्ये सर्वात यशस्वी, चिवट आणि जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवणारा वंश म्हणजे 'हिप्पॅरियन' (Hipparion).