फ्रान्समध्ये चक्क फ्रिजवर झाला सायबर हल्ला! हॅकर्सने यंत्रणेवर कसा ताबा मिळवला?
फ्रान्समधील सुपरमार्केटच्या फ्रिजवर सायबर हल्ले झाले आहेत. हॅकर्सनी फ्रिजचे तापमान वाढवून अन्नपदार्थांचे नुकसान केले आहे. काही ठिकाणी आगीच्या घटनाही घडल्या. या हल्ल्यामुळे सुपरमार्केट्सना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. फ्रान्समधील अधिकाऱ्यांकडून या घटनेची चौकशी सुरु आहे.