‘बँकांना जे जमलं नाही, ते स्मार्टफोनने केलं’; Gen Z चा गुंतवणुकीतील वाटा का वाढतोय?
‘बँकांना जे जमलं नाही, ते स्मार्टफोनने केलं’ - भारतातील छोट्या शहरांमधील जेन झी चा शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडामधील सहभाग कमालीचा वाढला आहे. मुंबई, दिल्लीसारख्या मेट्रो शहरांच्या पलीकडे जात नाशिक, नागपूर, सोलापूर, इंदूर आणि पाटण्यातील तरुण गुंतवणुकीत आघाडीवर आहेत. अलीकडच्या आकडेवारीनुसार, नव्या गुंतवणूकदारांमध्ये तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. स्मार्टफोन, डिजिटल केवायसी, सोशल मीडिया आणि एआयमुळे घडत असलेल्या आर्थिक बदलांमुळे तरुणांना बाजारात प्रवेश करणे सोपे झाले आहे.