हार्ट अटॅक टाळण्यासाठी एकच इंजेक्शन? नवे संशोधन काय सांगते?
कर्नाटक रणजी करंडक (Ranji Trophy) आणि कर्नाटक प्रीमियर लीगचा (KPL) माजी क्रिकेटपटू एस. एल. अक्षय याचे रविवारी मैदानावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या घटनेमुळे तरुण आणि फिट लोकांमध्ये उद्भवणारी हृदयविकाराची समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. एकीकडे ही चिंताजनक आकडेवारी समोर येत असतानाच, दुसरीकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान मात्र या घातक आजारावर कायमचा तोडगा शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहे.