पोर्तुगीजांच्या दहशतीखाली गोव्यात गणपतीची पूजा कशी केली गेली?
२६ मार्च १५५९ रोजी घरात मूर्ती ठेवण्यास बंदी घालणारा कायदा करण्यात आल्याचा उल्लेख पोर्तुगीज अभिलेखांमध्ये आढळतो. यानंतर २० डिसेंबर १५६६ च्या आदेशानुसार नवीन मंदिरे बांधण्यावर तसेच अस्तित्वात असलेल्या मंदिरांच्या दुरुस्तीवर पूर्ण बंदी घालण्यात आली. १५८१ मध्ये धर्मगुरूंना स्थानिक हिंदूंच्या धार्मिक आचारांची माहिती गोळा करून ते रोखण्याचे निर्देश देण्यात आले.