खोडात हजारो लीटर पाणी, सुपरफूड ते औषधे; ‘या’ झाडाला आफ्रिकेचा कल्पवृक्ष का म्हणतात?
आफ्रिकेच्या विस्तीर्ण सवाना गवताळ प्रदेशात दूरवर फांद्या जणू मुळांसारख्या आकाशाकडे पसरलेल्या आहेत असा एखादा प्रचंड वृक्ष दिसला तर प्रथमदर्शनी आपल्याला वाटेल की, हा वृक्ष कुणीतरी उपटून उलटा जमिनीत रोवला आहे. हा वृक्ष म्हणजे बाओबाब किंवा गोरखचिंच आफ्रिकेतील सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण, उपयुक्त आणि लोककथांनी वेढलेला वृक्ष. हजारो वर्षांपासून आफ्रिकेतील लोकांसाठी हा वृक्ष अन्न, पाणी, औषधे आणि आश्रयाचा स्रोत राहिला आहे. त्यामुळेच त्याला 'जीवन वृक्ष' (Tree of Life) असे संबोधले जाते.