गोविंदाला जेम्स कॅमेरॉनच्या Avatar: fire and ashes या हॉलिवूडपटासाठी आली होती का खरंच ऑफर?
सध्या ऑनलाइन फिरणारा गोविंदाचा व्हिडिओ खरा नाही. तो एआयच्या मदतीने तयार केलेला आहे. या व्हिडिओचा फायर अँड अॅश या मूळ अवताराशी कोणताही संबंध नाही. संपादित केलेल्या या फूटेजमध्ये गोविंदा त्याच्या खास मुंबईच्या बोलीत बोलताना दिसत आहे. त्याच वेळी पाठीमागे जॅक सुली आणि त्याचे कुटुंब दाखवले आहे. मात्र, प्रत्यक्ष चित्रपटात असे कोणतेही दृश्य नाही. म्हणजेच, हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असून केवळ सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.