नातवंडांसोबतचा वेळ ठरू शकतो ‘मेमरी बूस्टर’; काय सांगतंय नवे जागतिक संशोधन?
नातवंडांची काळजी घेणं, ही अनेकदा केवळ कौटुंबिक जबाबदारी किंवा प्रेमाची गोष्ट मानली जाते. पण अलीकडच्या एका महत्त्वाच्या संशोधनानुसार, हीच गोष्ट वयस्कर व्यक्तींच्या मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. वय वाढल्यावर स्मरणशक्ती कमी होणं, विचारांची गती मंदावणं किंवा शब्द आठवण्यात अडचणी येणं हे सर्वसाधारण मानलं जातं. मात्र, नातवंडांशी सक्रिय वर्तन आणि त्यांची काळजी घेणं मेंदूला अधिक काळ तल्लख ठेवण्यास मदत करू शकतं, असं या अभ्यासातून समोर आलं आहे.