भारतीय रंगभूमीवर ग्रीकांचा प्रभाव होता का? ‘यवनिका’चा इतिहास काय सांगतो?
भारतीय आणि ग्रीक या दोन रंगभूमी परंपरांचा विकास स्वतंत्रपणे झाला हा ज्ञात इतिहास आहे. इतिहासाच्या एका टप्प्यावर या दोन परंपरा परस्परांच्या संपर्कात आल्या. विशेषतः इ.स.पूर्व चौथ्या शतकात अलेक्झांडरच्या मोहिमांनंतर वायव्य भारतात ग्रीकांचा प्रवेश झाला आणि या सांस्कृतिक देवाणघेवाणीला अधिक वाव मिळाला. भारतीय रंगभूमीवर ग्रीक रंगपरंपरेचा नेमका किती प्रभाव पडला, यावर अभ्यासकांमध्ये आजही मतभेद आहेत. मात्र, या दोन संस्कृतींमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण झाली होती, याबाबत कोणाला फारसा संशय नाही.