हरियाणात १८,००० तरुणांचा मृत्यू; हृदय कसे सुरक्षित ठेवावे?
हरियाणा राज्य विधानसभेत बुधवारी सादर करण्यात आलेल्या एका धक्कादायक अहवालामुळे सार्वजनिक आरोग्यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. या अहवालानुसार, गेल्या सहा वर्षांत राज्यात १८ ते ४५ वयोगटातील सुमारे १८,००० लोकांचा मृत्यू हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) किंवा हृदयविकारामुळे झाला आहे. PTI ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, काँग्रेसच्या एका आमदाराने विचारलेल्या प्रश्नांच्या लेखी उत्तरात राज्य सरकारने ही माहिती दिली आहे.